• लेख क्र. ८ ऑनलाईन प्रेम

          टीप : कोणत्याही सोशल मीडियाचा किंवा कोणत्याही ऑनलाइन गेमचा ह्या ठिकाणी जाहिरात(Promotion) करायची नाही.

         पहिल्यांदी भेट झाली, ती एका गेमच्या मार्फत, गेम मध्ये ही मित्र जोडा(Add Friend) असा पर्याय होता आणि त्या गेम मध्ये मित्र जोडल्यावर(Friend add) किंवा मित्र झाल्यावरच पुढे चॅटचा option चालू होत होता. पुढे त्याच गेम मध्ये गप्पा(चॅट)/(व्हॉईस)असा पर्याय होता. त्याच पर्याय चा मदतीने रोज गपा होत असे. असेच गपा करता करता, दिवस जात होते. ती त्याच्या साठी ऑनलाईन यायची, असा त्याला वाटू लागल, याच मूळ कदाचित, तो ही रोज तिच्या साठी त्या गेम मध्ये ऑनाइन जात होतो. पण त्या गेमचा एक प्रॉब्लेम होता की जर समोरची वेक्ती ऑनलाईन असेल तरच त्या वेक्तीला मॅसेज जायचा. त्यामुळे कदाचित तिने त्याच्यासाठी तिचे insta चे अकाउंट उघडले. मग एकमेकांना मॅसेज तिथेच आणि गपागोष्टी होत असे. Insta वर आलेले/आवडलेले व्हिडिओ ती त्याला पाठवत (सेंड) असे आणि तो तिला. आसाच रोज गपा करता करता, दोघांन मध्ये एक घट्ट मैत्री झाली. ती मैत्री अतिशय घट्ट होती गेली. रोजच्या गपा गोष्टी चालत होत्या. सकाळी उठल्यापासून म्हणजे शुभ सकाळ(गुड मॉर्निंग) पासून तर रात्री शुभ रात्री(गुड नाईट) पर्यंत सर्व मॅसेज होत असे. दोघांन मध्ये तयार झालेला मैत्रीचा एक घट्ट धागा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेला. हळू-हळू दोघांचे एकमेकांना दिवसभर मॅसेज. दिवसभर काही बोलायला नसल तरी ही दिवसभर एकमेकांना मॅसेज ह्या त्या गोष्टी वरून. छोट्या-छोट्या गोष्टी तो तिला सांगत असे, ती पण त्याला त्या सर्व छोट्यातील छोटी गोष्ट त्याला सांगत असे. आज काय झालं, कोणा सोबत झालं, कशावरून झालं, का झालं, एकदम बारीक सारीक गोष्ट तिथे बोलली जात होती. कदाचित म्हणून दोघांचा एमेकांवर पक्का/घट्ट विश्वास बसत होता.

         या सर्वांमध्ये आश्चर्याची गोष्ट फक्त तेवढीच की, त्याने तिला फक्त फोटो मध्येच बघितल होत. आणि ते फोटो तिचेच होते. हे ही त्याला माहीच नवत. हळू-हळू करून एकमेकांचे नंबर एकमेकांना शेअर(exchange) झाले. नंतर परत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गप्पा(चॅट) सुरू झाल्या. मग व्हॉट्सॲप वर पण त्या गपा चालू होत्या. हळू-हळू दोघांना कळत होत, की हे जे आपल नात आहे. ते मैत्री च्या थोड पुढं गेलं आहे आणि प्रेमाच्या थोड अलीकड आहे आणि दोघं एकमेकांच्या मनाला हा प्रश्न विचारत असे. हे जे आपण रोज बोलतो ते काही वेगळ वाटयाला लागल होत. काही ठिकाणी एकमेकांच्या मनाचे संबंध जुळायला लागले होते. त्याने ही तिला थोडस वेगळ्या प्रकाराणी विचायच असा ठरवलं. त्याने तिला एकदिवस सहज मॅसेज केला, की मला थोड विचारायचं होत. ते पण थोड घाबरतच, कारण येवढ्या दिवसाचा विश्वास काही सेकंदात न तुटवा म्हणून, त्याने काही प्रश्न तयार केले आणि त्यात हा प्रश्न तिला विचारला की, “आपण हे रोज एकमेकांना मॅसेज करतो. सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपे पर्यंत एकमेकांना मॅसेज करतो, त्या माघे काही आहे, की फक्त मैत्रीच आहे.?” आणि कदाचित तिलाही काळल असेल की, ह्याला नेमक काय विचारायचं आहे. ती ही हसून म्हणाली, की ‘तू मला घाबरतोस का?’....त्याची बोलतीच बंद. मॅसेज काय टाईप करावा की, नाही. त्याला हेच समजेना आणि त्या गडबडीत त्याने मेसेज ही ‘हो’ टाईप करून दिला. प्रश्न च उत्तर बाजूला आणि दोघं मनसोक्त हसत बसले, खूप हसले. नंतर तिने टॅपिंग सुरू केली आणि दोन मीनट घेऊन शेवटी एक छोटस ‘हृदयच’ चिन्ह टाकून दोघांचे मन ही शांत झाले आणि त्या एका छोट्याश्या चिन्ह मध्ये सर्व काही सामावून गेलं. तो म्हणजे तिचा होकार. दोघांमध्ये निर्माण झालेली मैत्री, आता प्रेमाच्या वळणावर येऊन थांबली होती. दोघांनाही एकमेकांशी प्रेम झालं होत, हे तर नक्कीच. तरी ते प्रेम येवढे न दाखवता, ते एक मित्रमैत्रीणी सारखे राहत होते. एकदा दाखवलेली(express) भावना(फिलिंग) परत कधी दाखवल्याच नाही. असेच रोज दोघं बोलत राहायचे, त्या नंतर नात(relationship) अजूनच घट्ट होत गेलं.

         एक दिवस त्याने सहज तिला विचार की, विडियो कॉल करू का? तिला ही प्रश्न पडला कधी कॉलवर न बोलणारा मुलगा आज थेट(direct) विडियो कॉल. थोडा विचार करून ती ही म्हंटली का रे? तो बोलला काही नाही आज तुला बघावस वाटल. ती ही हसून हो का? तो थोडा चिडून म्हंटला हो आणि मोबाइल बाजूला ठेवून दिला. काही काळणे तिचा विडियो कॉल येतो. पण ती तिचा कॅमेरा बंद करून ठेवते. त्यामुळे तो म्हणतो की, कॅमेरा का बंद आहे? ती म्हणते, मी छान नाही दिसत आहे. मग हा ही त्याचा कॅमेरा ऑफ करून तिच्याशी बोलायला लागतो. तर त्यवार ती चिडून म्हणते की, कॅमेरा ऑन कर अस. तो ही मग तेच म्हणतो, मी ही चांगला दिसत नाही. त्या वर ती म्हणते तू कसा दिसतो आहे हे फक्त मी ठरवेल. मग तो प्रेमाने म्हणतो, मॅडम तुम्ही कश्या दिसत आहात, हे ही फक्त मी ठरवेल न.. मग दोघे ही आपले कॅमेरा चालू करून एकमेकांशी बोलायला लागले आणि त्याने तिला जस फोटो मध्ये बघितल होत ती त्या पेक्षा ही ती खूप सुंदर दिसत होती. असच काही काल बोलून दोघेही फोन ठेवतात.

         काही दिवसांनी त्याच्या messanger वर एक मेसेज आला, तो एक मुलगा होता, तो बोलला, की मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याने विचारलं की कोण आहे. त्याने त्याची माहिती सांगितली. त्याच नाव त्याने तिच्या तोंडून खूप वेळा ऐकल होत. मग त्याने तीच नाव घेतलं, मग ह्याने विचार की, तू तिला कस काय ओळखतो? मग त्याने सांगितलं की ती आणि मी आधी relationship मधे होतो. हे सर्वांवर ह्याचा विश्वासच बसत नव्हता. मग ह्याला त्याने सर्व पुरावे(proof) त्याने दाखवले. त्यांच्या मध्ये झालेले फोन(call), message हे सर्व दाखवले. तरी ही त्याला विश्वास बसत नव्हता. पण त्याने पण हे सर्व पुरावे संग्रहित(Save) केला.

                ह्या सर्व गोष्टी झाल्यावर. त्याने तिच्याशी बोलण थोडस कमी केल. हे तिच्या ही लक्षात आल होत. तिने त्याला खूप वेळ विचार की काही अडचण आहे का की, तू माझ्याशी बोलतच नाही आधी सारख. त्याने तीच थोडस बोलन टाळत. तो बोलला की, अग थोडस काम चालू आहे. म्हणून, तुला वेळ नाही देऊ शकत आहे. पण त्याने तिच्या वर राग न करता तिला एवढ्या गोष्टी सांगून शांत बसला. थोड्या दिवसांनी त्याने तिला विचारायचं ठरवल, पण त्याला काही कळतच नव्हत की कसं काय विचारू? कुठून सुरुवात करायची? अशे अनेक प्रश्न त्याचा मनात घर करत होते, हे सर्व त्याला तिला विचारं गरजेचे होते म्हणून, त्याने सर्व विचार करून तिला विचारायचं ठरवल. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करता तो संपूर्ण पणे औदासिन्य(depression) मध्ये गेला होता. त्याला स्वतःला ह्या सर्वांतून सावरून त्याला त्याच्या मार्गावर पण यायचं होत.

            त्याने तिला एक मेसेज केला, थोड बोलायच आहे. ती म्हणाली की रे काय झाल. तो म्हणला, काही गोष्टी आहे, त्याची मला खात्री करायची आहे. ती म्हणते काय आहे काही झाल आहे का? तो म्हणतो हो आहे काही गोष्टी आहे. ती म्हणते बर विचार. तो म्हणतो की तुझ ह्या आधी कोणाशी काही relation होत का? तिला कळाल होत की ह्या त्याने सांगितल असेल. मग ती म्हणते, हो आधी एक मुलाशी माझ relation होत. तिने त्याला सर्व गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्याला मिळालेल्या पुराव्यातिल संपूर्ण गोष्ट खरी होती. अजून काही विचारायच असेल तर विचार मी सांगायला तयार आहे. तो म्हणतो नाही काही नाही येवढंच विचारायच होत. मग तिने अजून एक मेसेज केला. आणि त्यात लिहिल की, मला तुला गमवायच नव्हत. म्हणून मी तुला काही सांगितल न्हवत. म्हणून, मी तुला काही सांगितल नाही आणि तुला तरीही वाटत असेल ह्या सर्वात माझीच चूक आहे तर. तुला संपूर्ण अधिकार आहे. की, तुला माझ्या सोबत राहायच आहे की नाही. त्याने तिच्या कडून एक दिवसाचा वेळ माघितला. संपूर्ण दिवस हो हाच विचार करत बसला. त्याने तिला सकाळी मेसेज केला hii. त्यावर ती म्हणाली हा बोल ना. तो म्हणतो, फोन करू का? त्यानंतर त्याने फोन केला. तो म्हणतो की, तू मला हे सर्व खर सांगितल. पण, तू मला ह्या ऐवजी खोट ही सांगू शकली असती आणि तू तास काही केल नाही. मला माफ कर मी तुला आशे प्रश्न विचारले ह्या बदल. ती म्हणते, अरे! वेड आहेस का? माफी कसली माघतो आहे. ह्या सर्व गोष्टी तुझ्या मनात साठून राहण्यापेक्षा तू विचारून घेतलस हेच चांगल आहे. परत तुझ मन तुला खात बसल असत. त्यावर तो म्हणतो की, आपण आपल relationship परत continue करूया. ती म्हणते, हो. मला वाटलच होत की, तू ही सर्व सोडून नाही देनार आणि दोघांनी हसत हसत फोन ठेवला. त्याने विचार केला असता तर.

            तो फक्त त्या मुलीचीच चुकी दाखवून ह्या सर्वातून बाहेर पडला असतं. पण, त्याने तस नाही केल. कदाचित ह्यालाच खर प्रेम म्हणत असतील. कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांची साठी न सोडावी.

    -------*धन्यवाद*-------



    Written By : Prathmesh N S